ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात अनोखा महोत्सव, बनवली तब्बल ५ हजार किलो मिसळ
VIDEO | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून तयार केली ५ हजार किलो मिसळ, बघा व्हिडीओ
पुणे : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले. गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी पहाटे ३ पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता भव्य अशा कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लीटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.

जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा

‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?

धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती

'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
