Immoral relationship संशायातून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न, आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर

| Updated on: Mar 29, 2022 | 10:37 AM

पतीने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची (Attempt to Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात हा प्रकार घडला. अनैतिक संबंधाच्या संशयातून (Extra Marital Affair) पतीकडून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

पिंपरी चिंचवड : पतीने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची (Attempt to Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात हा प्रकार घडला. अनैतिक संबंधाच्या संशयातून (Extra Marital Affair) पतीकडून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. किवळे परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी पती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती अमोल थोरात याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी अमोल थोरात याने आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात ही घटना घडली आहे.

Published on: Mar 29, 2022 10:36 AM