किरीट सोमय्या पुन्हा पुणे दौऱ्यावर, महापालिकेतील सत्काराला काँग्रेसचा विरोध

किरीट सोमय्या पुन्हा पुणे दौऱ्यावर, महापालिकेतील सत्काराला काँग्रेसचा विरोध

| Updated on: Feb 11, 2022 | 10:06 AM

पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्यावतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे महापालिकेच्या आवारात पुणे पोलिसांच्यावतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भाजपनं त्याच पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. या सत्काराला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. काँग्रेस सोमय्यांचा विरोध करणार त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता किरीट सोमय्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून मात्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.