शरद मोहोळच्या हत्येमागे कोण? भाजप पदाधिकारी आणि गुंड विठ्ठल शेलार अटकेत

शरद मोहोळच्या हत्येमागे कोण? भाजप पदाधिकारी आणि गुंड विठ्ठल शेलार अटकेत

| Updated on: Jan 17, 2024 | 12:43 PM

ज्या भाजप नेत्यांनी शरद मोहोळला देशभक्त ठरवलं त्याच मोहोळच्या हत्या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि गुंड विठ्ठल शेलार अटक झाली आहे. विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोन्ही आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली

मुंबई, १७ जानेवारी २०२४ : पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात शेलार टोळीचा म्होरक्या गुंड विठ्ठल शेलारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि धक्कादायक म्हणजे आता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्या भाजप नेत्यांनी शरद मोहोळला देशभक्त ठरवलं त्याच मोहोळच्या हत्या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि गुंड विठ्ठल शेलार अटक झाली आहे. विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोन्ही आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मोहोळच्या हत्येमागे याच दोघांचा हात असल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. काही दिवसांपूर्वीच्या एका बैठकीत या हत्येचा कट रचला होता, असे पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यात आधीपासूनच वैर होतं. हा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे? शरद मोहोळची पार्श्वभूमी काय जाणून घ्या, स्पेशल रिपोर्टमधून…

Published on: Jan 17, 2024 12:43 PM