जिथं राडा केला तिथंचं पुणे पोलिसांनी कोयता गॅगला शिकवला धडा!
सराईत गुंडांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकून धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची काढली धिंड
गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोयता गँगची दहशत पसरली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील गुडांची धिंड काढून त्यांना धडा शिकवला आहे. पुणे पोलिसांनी या गुँडांना सबक शिकवण्यासाठी धायरी फाटा ते धायरी गाव अशी कोयत्या गँगची धिंड काढली आहे. अल्पवयीन मुलावर कोयता गँगमधील गुंडांनी कोयत्याने वार केले होते त्या गुडांच्या पोलिसांनी मुसक्या अवळत त्यांना अटक केली आहे.
पुण्यातील भैरवनाथ मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी काही गुंडांनी धुडगूस घातला होता. यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. हे गुंड इथेच थांबले नाही तर त्यांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वारही केले होते. त्याच सराईत गुंडांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सराईत तीन गुंडांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर कोयता गँगची धिंड धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान काढण्यात आली आहे.