पबचं बील 48 हजार, 12 वी पासच्या पार्टीनं केला घात, दारूच नाहीतर ड्रग्सचीही नशा?
१२ वी पास झाल्यामुळे पबमध्ये १०-१२ मित्रांसाटी पार्टी कोझी पब मधल्या दारूचं बिल ४८ हजार रूपये झालं. आता अल्पवयीन आरोपीसबोत पार्टी करणाऱ्या मित्रांचीही पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असताना वडीलांना अल्पवयीन मुलाच्या हाती कार दिली. आणखी काय काय धक्कादायक खुलासे आले समोर?
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी याने दोघांना चिरडण्याआधी फक्त दारूच सेवन केलं असं नाही तर त्याने पबमध्ये नशा केली होती, अशी शंका पुणे पोलिसांना आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात झाली आणि आता एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे अपघाताच्या दिवशी अल्पवयीन आरोपीने दारूसह ड्रग्सच सेवन केल्याची शंका आहे. अडीच कोटींची पॉर्शे कार चालवण्याआधी अल्पवयीन आरोपी हा ऑडी कार चालवायचा. १२ वी पास झाल्यामुळे पबमध्ये १०-१२ मित्रांसाटी पार्टी कोझी पब मधल्या दारूचं बिल ४८ हजार रूपये झालं. आता अल्पवयीन आरोपीसबोत पार्टी करणाऱ्या मित्रांचीही पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असताना वडीलांना अल्पवयीन मुलाच्या हाती कार दिली. मुलानं कार मागितली तर चालवायला दे, तू बाजूला बस अशी सूचना विशाल अग्रवालने कार चालकाला दिली. तर अपघातावेळी अल्पवयीन आरोपीचा ड्रायव्हर कारमध्ये होता. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…