Special Report | राणेंच्या पत्नी-मुलाविरोधात लूकआऊट सर्क्युलर!
महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे एकीकडे ईडीचा ससेमीरा लागला आहे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट सर्क्यूलर जारी करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे एकीकडे ईडीचा ससेमीरा लागला आहे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लूकआऊट सर्क्यूलर जारी करण्यात आलं आहे. कर्ज थकीत प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. तर ठाकरे सरकारने घाबरुन कारवाई केली, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. “पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे”, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !