मनोज जरांगे पाटील आपल्या पायी मोर्च्याचा पुण्यातील मार्ग बदलणार? पोलिसांची विनंती काय?
जरांगे पाटील यांचा पायी मार्चा आता पुण्यात येऊन धडकला आहे. मात्र मुंबईला जण्यासाठी पुण्यातील जो नियोजित मार्ग आहे तो बदलावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल्याने पुण्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होतेय.
पुणे, २४ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पुण्यातील पायी मोर्च्याचा मार्ग बदलावा, अशी विनंती पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा पायी मार्चा आता पुण्यात येऊन धडकला आहे. मात्र मुंबईला जण्यासाठी पुण्यातील जो नियोजित मार्ग आहे तो बदलावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल्याने पुण्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होतेय. त्यामुळे हा मार्ग बदलावा, असे मनोज जरांगे पाटील यांना पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले असून जहांगीर रूग्णालयाकडून न जात सादर बाबा चौकातून जाण्याची विनंती पुणे पोलिसांनी केली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे पुणे पोलिसांनी हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.