हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 29, 2024 | 2:23 PM

पुणे अपघात प्रकरणामधील ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी पुण्यातील ससूनमधील डॉ. अजय तावरे हे अटकेत आहेत. दरम्यान, डॉ. अजय तावरे यांच्या जीवाला धोका असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे अपघात प्रकरणामधील ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी पुण्यातील ससूनमधील डॉ. अजय तावरे हे अटकेत आहेत. दरम्यान, डॉ. अजय तावरे यांच्या जीवाला धोका असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘डॉ. अजय तावरे म्हणाले, माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कारण पोर्शे कार प्रकरणामध्ये मोठे प्रस्थ आहेत आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे डॉ. अजय तावरे यांच्या जीविताला धोका होऊ शकतो’, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय. ‘येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन’, असे म्हणत अंधारेंनी इशाराच दिलाय. यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दुसरं कोणतंही राज्य नाही तर महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं इथं एवढं सोपं काम नाही. यासह डॉ. अजय तावरे यांची सुरक्षा कशी ठेवायची आणि काळजी कशी घ्यायची याची काळजी पोलीस घेतील असेही शिरसाट यांनी म्हटले.

Published on: May 29, 2024 02:23 PM