Porsche Pune accident : नष्टा, टीव्ही, हॉलीबॉल, फुटबॉलची सोय, दोन जणांना चिरडणाऱ्या वेदांतचा असा असेल दिनक्रम
दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला उडवणाऱ्या वेदांत अग्रवालचं पुढे काय होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवाल याला 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाच्या तपासापर्यंत आरोपी बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवाल याला 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाच्या तपासापर्यंत आरोपी वेदांत अग्रवालला बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आरोपी वेदांत हा सज्ञान की अज्ञान? हे पोलीस तपासानंतर ठरणार आहे. दरम्यान, वेदांत अग्रवालचा बाल सुधारगृहात असताना खालील प्रमाणे त्याचा दिनक्रम असणार आहे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत नाष्टा दिला जाणार, नाष्ट्याला पोहे, उपीट, अंडी, दूध असणार. 11 वाजता प्रार्थनेची वेळ, 11 ते 1 इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या होणार, 1 ते 4 डॉर्मेटरीमध्ये आराम, 4 वाजता पुन्हा नाष्टा, 5 वाजेपर्यंत टीव्ही पाहण्याचा वेळ, 5 ते 7 व्हॉलीबॅाल-फुटबॅाल खेळायला सुट्टी, 7 नंतर जेवण, 8 वाजता झोपण्यासाठी डॉर्मेटरीमध्ये रवानगी तर जेवणासाठी सात्विक पौष्टिक आहाराचे मेन्यू. यामध्ये पालेभाज्या, चपाती, वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू दिले जाणार आहे.