पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसानं नागरिकांची उडाली दाणादाण
VIDEO | पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं काही गावांना झोडपलं, नागरिकांची तारांबळ आणि पिकाला फटका बसण्याची शेतकऱ्यांना भीती
पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं, काही गावांना चांगलच झोडपून काढलं. साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. यावेळी नागरिकांची पावसानं मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीनं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. तर पुणे शहरातील तापमान वाढल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्यात यलो अलर्ट असल्याने विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य

लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
