एक माणूस आला नाही…, मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
पुण्यात अचानक पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक नागरिकांच्या मदतीसाठी धावलं... मात्र संकटात असताना, दिवसभर घरात पाणी भरलं असताना कोणीही घराकडे मदत करायला किंवा पाहणी करायला न आल्याने एका युवकाला अश्रू अनावर झालेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर पुण्यातील एका युवकाने टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले. काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच वाताहत झाली. पुण्यातील काही सखल भागात मुसधार पावसाचे पाणी शिरले होते. वाहनंदेखील पाण्यात बुडाले होते. पुण्यात अचानक पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक नागरिकांच्या मदतीसाठी धावलं… मात्र संकटात असताना, दिवसभर घरात पाणी भरलं असताना कोणीही घराकडे मदत करायला किंवा पाहणी करायला न आल्याने एका युवकाला अश्रू अनावर झालेत. एकता नगर परिसरातील या युवकाने मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. पाऊस आला की नेहमी आमच्या सोसायटीमध्ये पाणी भरतं मात्र कोणीही राजकारणी किंवा अधिकारी आमचा प्रश्न सोडवत नाहीत. प्रत्येक वेळी पाणी घरात येतं मात्र त्यावर कोणीच तोडगा काढत नाही. आम्हाला कोणतीही शासकीय मदत नको मात्र किमान आमची विचारपूस करावी, अशी अपेक्षा या तरूणाने व्यक्त केली.