पुण्यात पर्यटनबंदी, लोणावळ्यातील पर्यटनाला फटका

पुण्यात पर्यटनबंदी, लोणावळ्यातील पर्यटनाला फटका

| Updated on: Jul 17, 2022 | 1:13 PM

पुण्यात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. लोणावळ्यातील पर्यटनाला यामुळे फटका बसला आहे. लोणावळ्यातील सहारा ब्रीज निर्मनुष्य करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

पुण्यात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. लोणावळ्यातील पर्यटनाला यामुळे फटका बसला आहे. लोणावळ्यातील सहारा ब्रीज निर्मनुष्य करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. भुशी धरणासह इतर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहारा ब्रीजवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. हा ब्रीज नेहमीच वाहनांनी आणि पर्यटकांनी गजबजलेला असतो. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी, सेल्फी-फोटो काढण्यासाठी पर्यटक इथे थांबतात. मात्र या ब्रीजवर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पहायला मिळत आहे.

Published on: Jul 17, 2022 01:13 PM