Swargate Bus Crime Video : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेनं शिंदेंकडे व्यथा मांडत केली एकच मागणी, म्हणाली…
पुणे बलात्कार प्रकरणातील पीडितेनं विधान भवनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील या भेटीदरम्यान उपस्थित होत्या. पीडित तरूणीने या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तिची व्यथा मांडली. तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या, अशी मागणी पीडित तरूणीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान, या भेटीदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. पीडित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित तरूणीला न्यायासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले. इतकेच नाहीतर राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
नेमकं काय घडलं?
पुण्याचं स्वारगेट एसटी स्टँड पहाटे साडेपाच वाजले होते. तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आली आणि बसची वाट पाहत बाकावर बसली. त्याच वेळी नराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून कुठे जायचं आहे अशी विचारणा केली. त्यावर तरुणीने फलटणला जायचं आहे असं सांगितलं. पण फलटणची बस या ठिकाणी नसून दुसरीकडे लागल्याचं गाडे म्हणाला आणि मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो असं म्हणत बसकडे घेऊन गेला आणि बस जवळ येताच बसमध्ये अंधार असल्याने तरुणी थांबली. पण रात्रीची बस असल्याने प्रवासी झोपल्याने लाईट्स बंद असल्याचं गाडे म्हणाला. त्यामुळे तरुणी बसमध्ये चढताच दार लावलं आणि नराधम दत्तात्रय गाडेन अतिप्रसंग केला.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल

कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
