VIDEO : Pune | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणारं उद्यानाचं उद्धाटन रद्द
शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे या उद्यानाच्या उद्घाटन स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजेरी लावणार होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दाैरा सध्या वादात सापडल्याचे चित्र बघायला मिळते आहे. कार्यकर्त्ये आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी कधी काय करतील हे सांगणे थोडे अवघडच ठरते. असाच एक प्रकार पुण्याच्या हडपसर परिसरात घडला आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे या उद्यानाच्या उद्घाटन स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजेरी लावणार होते. मात्र, विरोध वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम अचानकच रद्द केला आहे.
Published on: Aug 02, 2022 10:21 AM
Latest Videos