पुणे टॉप न्यूज, विद्यापीठात जाताना नोंदणी करावी लागणार

पुणे टॉप न्यूज, विद्यापीठात जाताना नोंदणी करावी लागणार

| Updated on: Jan 21, 2023 | 11:58 AM

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जाताना आता नाव नोंदणी करावी लागणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्यापाठाने हा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून नागरिकांच्या डाटाही विद्यापीठात जमा होणार आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. भोरमध्ये ठाकरे गटातील नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जाताना आता नाव नोंदणी करावी लागणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्यापाठाने हा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून नागरिकांच्या डाटाही विद्यापीठात जमा होणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जुन्नरमध्ये १२०० फूट खोल दरीत पडलेला मृतदेह काढण्यात यश आले आहे. नऊ तासांच्या मोहिमेनंतर हा मृतदेह शोधण्यात आला.

Published on: Jan 21, 2023 11:58 AM