पुणे टॉप न्यूज, पुणे महानगरपालिकेला १६०० कोटींचे उत्पन्न
पुणे महानगरपालिकेला यंदा 1600 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. फेब्रुवारीपर्यंत हे उत्पन्न आहे. कोणतीही करसवलत न दिल्यामुळे मनपाला हे उत्पन्न झाले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे महानगरपालिकेला यंदा 1600 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. फेब्रुवारीपर्यंत हे उत्पन्न आहे. कोणतीही करसवलत न दिल्यामुळे मनपाला हे उत्पन्न झाले आहे. पुणे येथील भिडे वाड्यातील रहिवाशी व गाळेधाराकांना पर्यायी जागा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे. यामुळे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यास राज्य सरकारनं पावले उचण्यास सुरुवात केली आहे.
Published on: Feb 08, 2023 11:04 AM
Latest Videos