Pune | पुण्यातील दुकानं सुरुच राहणार, काळ्या फिती लावून निषेध करणार, व्यापाऱ्यांची भूमिका
उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदच आवाहन मात्र पुण्यातील व्यापारी दूकानं सुरूच ठेवणार आहेत. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून करणार घटनेचा निषेध करणार असल्याचं पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदच आवाहन मात्र पुण्यातील व्यापारी दूकानं सुरूच ठेवणार आहेत. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून करणार घटनेचा निषेध करणार असल्याचं पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात व्यापार बंद राहिल्यानं दूकानं बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही त्यामुळं काळ्या फिती बांधून व्यवसाय सुरुच ठेवणार असल्याचं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी म्हटलं आहे. उद्याचा बंद पुण्यात कितपत यशस्वी होणार ? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. पुणे जिल्हा रिटेल संघानं दूकानं उघडी ठेवणार असल्याची माहिती अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली आहे. तर व्यापारी महासंघाची दूपारी बैठक होणार असून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका अंतिम निर्णय घेणार आहेत.
Latest Videos