पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Jun 16, 2023 | 10:47 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या भावाच्या जीवेला धोका, गोळीबार करून जीवे मारण्याची कुणी दिली धमकी?

पुणे : पुण्यात राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना धमक्या देण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसताय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुंडाला पुणे वानवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेलार हा सराईत गुंड असून त्याला पुणे शहर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तडीपार केल्यानंतर तो वानवडी परिसरात आला होता. दारूच्या नशेत असलेल्या शेलार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडून काही शस्त्र जप्त करण्यात आलेत.

Published on: Jun 16, 2023 10:24 AM