Pro Govinda 2024 : ठाण्यात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन, हजारो गोविंदांची हजेरी, कुठे-कधी होणार फायनल?
३० हून अधिक संघांनी प्रो गोविंदा स्पर्धेत भाग घेतला आहे. यामध्ये १६ संघाची निवड करण्यात येणार आहे. सात हजार गोविंदा पथकांनी या स्पर्धेत हजेरी लावत मनोरे रचले आहे. येत्या १८ तारखेला वरळी डोम येथे अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेचे बक्षीस देखील लवकरात लवकर जाहीर करणार आहे,
ठाण्यात प्रो गोविंदाचे आयोजन पूर्वेश सरनाईक यांच्याकडून करण्यात आले आहे. यावेळी ३० हून अधिक संघांनी प्रो गोविंदा स्पर्धेत भाग घेतला आहे. यामध्ये १६ संघाची निवड करण्यात येणार आहे. सात हजार गोविंदा पथकांनी या स्पर्धेत हजेरी लावत मनोरे रचले आहे. येत्या १८ तारखेला वरळी डोम येथे अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेचे बक्षीस देखील लवकरात लवकर जाहीर करणार आहे, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. तर गोविंदांना राज्य सरकार आणि आमच्या वतीने विमा कवच देण्यात आले आहे. 30 जणांची समन्वय समिती निवडली आहे. देशाचे क्रीडा मंत्री आणि राज्याचे क्रीडा मंत्री यांना या स्पर्धेसंदर्भात निवेदन देणार आहे. यामध्ये प्रो गोविंदांना वेगळे स्थान देण्यात यावे, कबड्डीमध्ये जसे शासन भरती करत असते तसेच दही हंडींच्या स्पर्धकांना देखील स्थान द्यावे, अशी मागणी करणार आहे, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.