संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, ‘या’ नेत्यानं थेट काढली लायकी?
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली लायकी किती आहे? याचा विचार त्यांनी आधी केला पाहिजे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांचं मानसिक संतुलनपण बिघडलेलं', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर कुणाचं प्रत्युत्तर?
अकोला, ५ मार्च २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए देश मेरा परिवार है, अशी घोषणा देत लोकसभा निवडणुकीला सुरुवात केली. लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपातील नेत्यांनी ‘नरेंद्र मोदी परिवार’ अशी मोहीम सुरू केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. तुमचा परिवार म्हणजे लूटमार करणाऱ्यांचा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तुमचा परिवार म्हणजे मूठभर धनदांडग्यांचा, श्रीमंतांचा तुमचा परिवार आहे. तुमचा परिवार म्हणजे लूटमार करणारे, पक्ष फोडणाऱ्यांचा परिवार आहे. ते ‘परिवार’ या गोंडस नावाखाली लोकांकडून मतं मागत आहेत. पण यावेळी तुमच्या या भूलथापांना सामान्य जनता बळी पडणार नाही, असे राऊतांनी म्हटले आणि मोदींवर जोरदार टीका केली. तर यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. विखे पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी अजून भरपूर शिकायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली लायकी किती आहे? याचा विचार त्यांनी आधी केला पाहिजे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांचं मानसिक संतुलनपण बिघडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर काय बोलायचं…असे म्हणत विखे पाटलांनी राऊतांवर प्रहार केला.

VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा

दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल

'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ

स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
