काँग्रेस नेते भाजपात जाणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य काय?

काँग्रेस नेते भाजपात जाणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य काय?

| Updated on: Jan 02, 2024 | 6:05 PM

काँग्रेस मधील अनेक लोकांची इकडे भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. उद्याच्या राजकारणात त्याचा परिणाम दिसणारच आहे. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर तर वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत. वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे

नाशिक, २ जानेवारी २०२४ : काँग्रेसमधील अनेक लोकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. तर आगामी काळात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक बातम्या ऐकायला मिळतील, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस मधील अनेक लोकांची इकडे भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. उद्याच्या राजकारणात त्याचा परिणाम दिसणारच आहे. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत. ना कुणाला कार्यकर्त्यांची चिंता आहे ना पक्षाची चिंता आहे. फक्त वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होतील तशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील, असेही त्यांनी म्हटले तर यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यावेळी भाजप सत्तेत राहणार नाही, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील कुठे जाणार? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Jan 02, 2024 06:05 PM