‘या’ जिल्ह्याचं नाव होणार अहिल्यानगर, केंद्राकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय दिला शब्द?

‘या’ जिल्ह्याचं नाव होणार अहिल्यानगर, केंद्राकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय दिला शब्द?

| Updated on: Feb 25, 2023 | 9:27 PM

VIDEO | मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अहमदनगरच्या नामकरणाला समर्थन, काय म्हणाले बघा व्हिडीओ?

अहमदनगर : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामाकरण केले आहे. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने मोठा आनंदोत्सव साजरा केला. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरच्या नामकरणाला समर्थन दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्ह्यांचे ज्या प्रमाणे नामकरण करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यालाला अहिल्यानगर नाव देणं हे भूषणावह असल्याचे म्हटले आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबरच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ट्विट करत अहिल्यादेवी यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यासाठी आता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही नामकरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांंनी सांगितले.

Published on: Feb 25, 2023 09:27 PM