Ladki Bahin Yojana : मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, सरकारच्या योजनेवर कुणाची खोचक टीका?
सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी संघटनेचे नेत्यानी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे
सध्या राज्यभरात एकाच सरकारी योजनेचं नाव आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी असून रघुनाथ पाटील यांनी सरकारच्या या योजनेबद्दल संशय व्यक्त केला आहे. इतकंच नाहीतर खोचक टीकाही केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राजकीय उद्देशानेच जाहीर केल्याचा आरोप करीत मुळात ही योजनाच फसवी आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटले. तर 1500 रुपयांप्रमाणे पैसे द्यायला सरकारकडे पैसे आहेत कुठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.