Rahul Gandhi : राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल, राहुल हे गांधींचे वंशज आहेत, त्यांना ईडी रोखू शकत नाही, काँग्रेसचं ट्विट
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ईडीने चौकशीसाठी (ED Notice) बोलवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (Congress) अधिकृत ट्विटर अकाऊंटनरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “हुकुमशाह कान उघडून ऐका, राहुल गांधी हे गांधी घराण्याचे वंशज आहेत. त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. सत्याच्या लढाईत तुम्ही कधीच राहुल गांधी यांच्याशी जिंकू शकत नाही”, असं ट्विट करण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. आता दुसरीकडे काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “राहुल हे गांधींचे वंशज आहेत, त्यांना ईडी रोखू शकत नाही. सत्याची लढाई केवळ राहुल गांधींच जिंकणार!”, असं काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय.