Dis’Qualified MP : खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये काय बदललं?
VIDEO | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईल बायोमध्ये मोठा केला बदल, कोणता तो पहा?
मुंबई : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये मोठा बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर अपात्र खासदार असा उल्लेख केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता Dis’Qualified MP असा उल्लेख केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावर काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या मोदी संदर्भातील वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी आणि त्यांचे वक्तव्यावरून निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आता आक्रमक झाली आहे. काँग्रेसनेही आंदोलनाचा इशारा दिला असून ज्या भाजपने लोकशाहीला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आता काँग्रेस एक दिवस नाही तर वर्षभर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपला देण्यात आला आहे.