“ही लढाई नरेंद्र मोदी, विचारधारा आणि ‘इंडिया’मध्ये”; राहुल गांधी यांचा निर्धार
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. तर या बैठकीतून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली.
बंगळुरू , 19 जुलै 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीच्या विजयी रथाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. तर या बैठकीतून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली. यावेळी राहुल गांधी यांनी, आमची लढाई भाजपाची विचारधारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असल्याचे सांगितलं. तर देशात बेरोजगारी वाढत असून पूर्ण संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती गेली आहे. ही लढाई विरोधक आणि भाजपाविरोधात नाहीये तर ही लढाई आता एनडीए आणि INDIA मध्ये आहे. ही लढाई मोदी आणि ‘इंडिया’मध्ये असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 19, 2023 10:04 AM
Latest Videos