मोदींच्या माफीमागे ‘ही’ 3 कारणं, पंतप्रधानांच्या माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल
गेल्या साठ वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळण्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनीस कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. तुम्ही ५० वर्षानंतर या हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते, असा हल्लाबोलही राहुल गांधींनी केला. तर शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता. मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.