Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'माझे बाबा, आजी-आजोबांचं रक्त सांडलंय इथं' असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी नेहरुंच्या शब्दातच सुनावलं!

‘माझे बाबा, आजी-आजोबांचं रक्त सांडलंय इथं’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी नेहरुंच्या शब्दातच सुनावलं!

| Updated on: Feb 08, 2022 | 1:35 PM

माझ्या आजी आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं, असं म्हणत त्यांनी देशाला विभागण्याचं काम भाजपकडून करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्ताव सादर करताना लोकसभेत उत्तर दिलंय.

2 फेब्रुवारीला लोकसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi in Loksabha) यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी भाजप सरकार आणि आरएसएसवर तिखट शब्दांत समाचार घेतला होता. माझ्या आजी आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं, असं म्हणत त्यांनी देशाला विभागण्याचं काम भाजपकडून करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्ताव सादर करताना लोकसभेत उत्तर दिलंय. चक्क नेहरुंच्या (Nehru) वक्तव्याचा दाखल देत राहुल गांधी यांचे मुद्दे नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी खोडून काढलेत. 2 फेब्रुवारीला केलेल्या राहुल गांधी यांच्या आरोपांना मोदींनी सात फेब्रुवारीला केलेल्या लोकसभेतील संबोधनात उत्तर दिलं आहे. नेहरुंनी केलेली वक्तव्य नेमकी कोणती होती, ज्याचा आधार घेत राहुल गांधी यांना मोदींनी सुनावलं, ते जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…

Published on: Feb 08, 2022 01:21 PM