सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील कपील सिब्बल यांच्या मतावर काय म्हणाले राहुल नार्वेकर, बघा व्हिडीओ
VIDEO | राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीचा पहिला दिवस, सत्तासंघर्षाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय दिली प्रतिक्रिया
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीचा पहिला दिवस होता. मात्र आणखी पुढील दोन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे. या सत्तासंघर्षाबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आमदारांना निलंबन करण्याचा निर्णय आणि कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, आणि तसे मत आज सर्वोच्च न्यायालयाने देखील नोंदवले आहे. तर आमदारांना अपात्र ठरवाण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्ष अनुपस्थित असताना ते अधिकार उपाध्यक्षांना जातात. मात्र अध्यक्ष उपस्थित असताना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार उपाध्यक्षांना नसतो, असेही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्षांची निवड नियमानुसार, मतदान घेऊन निवड झाली आहे. मतदान घेताना जे आमदार पात्र असतात त्यांना मतदानाचा अधिकार असतो. जे आमदार उपस्थित होते आणि कार्यरत होते त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यामुळे कोणतंही वेगळं मत कोर्ट मांडू शकत नाही, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.