नार्वेकर कोण? संजय राऊत यांच्या ‘त्या’ प्रश्नावर राहुल नार्वेकर थेट म्हणाले, ‘…तो अधिकार माझाच’
VIDEO | आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर, म्हणाले...
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयातून कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचंच लक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील सत्तासघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपचे नेते कोर्टाच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताय म्हणत राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येणारच सांगणारे नार्वेकर कोण? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर यावरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार माझाच असल्याचे म्हणत विधानसभा अध्यक्षपद रिक्त असतं तेव्हा ते अधिकार उपाध्यक्षाला असतात. पण जेव्हा विधानसभा अध्यक्ष चार्ज घेतात. तेव्हापासून उपाध्यक्षाला दिलेले अधिकार काढून घेतले जातात. कोणताही कायदा प्रॉस्पेक्टिव्ह असतो रेस्ट्रोस्पेक्टीव्ह नसतो. त्यामुळे आज महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षपद रिक्त नाही. निलंबनाचा किंवा अपात्रतेचा निर्णय असो किंवा अध्यक्षांच्या अधिकारातील कोणताही प्रश्न त्याचा अधिकार अध्यक्षाला असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.