Shivsena MLA Disqualification : उद्धव ठाकरे यांना २०१८ ची ‘ती’ चूक महाग पडली अन् त्यांनी शिवसेना गमावली
शिंदेंकडेच शिवसेनेची कमान आली पण त्यासाठी २०१८ ची एक चूक समोर आली आहे. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाती शिवसेना देताना २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या शिवसेना घटनादुरूस्तीवर बोट ठेवलंय आणि ही घटनादुरूस्ती अमान्य करत २०१९ ची घटनादुरूस्ती मान्य केली.
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली. मात्र त्यांचे १४ आमदार पात्र ठरले. शिंदेंकडेच शिवसेनेची कमान आली पण त्यासाठी २०१८ ची एक चूक समोर आली आहे. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाती शिवसेना देताना २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या शिवसेना घटनादुरूस्तीवर बोट ठेवलंय आणि ही घटनादुरूस्ती अमान्य करत २०१९ ची घटनादुरूस्ती मान्य केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात आली. तर १९७६ मध्ये त्यांनी पक्षाची घटना तयार केली. १९९९मध्ये त्यांनी घटनेत काही बदल केले, आयोगानंही ते समंत केले. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी घटनेत जे बदल केलेत त्याची नोंद आयोगाकडे नाही. त्यामुळे १९९९ची शिवसेना घटनाच ग्राह्य धरली असून २०१८ ची घटनादुरूस्ती मान्य करण्यात आली.
Published on: Jan 12, 2024 11:00 AM
Latest Videos