राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, थेट आव्हान देत संजय राऊत यांनी काय केला दावा?
VIDEO | संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा, विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करत केला मोठा दावा
मुंबई : आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या देशात आजही संविधान आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला आजही वाटते, देशातरील राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद कोर्टात आहे. असं सांगताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, भाजपचे नेते कोर्टाच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताय. राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेलं पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तर राज्यातील आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याच हातात येईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट नार्वेकर यांचाच राजीनामा मागितला. राहुल नार्वेकर यांची कायद्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदा मंत्र्याने बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितलं का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसं माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चाललंय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना केला आहे.