Video : आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक...

Video : आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक…

| Updated on: Jul 11, 2022 | 12:58 PM

आज शिवसेना खासदारांची (Shivsena MP) बाठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. खासदार राहूल शेवाळे, राजेंद्र गावित आणि इतर काही खासदार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) द्रौपदी मुर्मू यांना […]

आज शिवसेना खासदारांची (Shivsena MP) बाठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. खासदार राहूल शेवाळे, राजेंद्र गावित आणि इतर काही खासदार द्रौपदी मुर्मु यांना पाठींबा देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देणार का? हाच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.