वाशी रेल्वे स्थानकात चोरट्याला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशी रेल्वे स्थानकात चोरट्याला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

| Updated on: Mar 08, 2022 | 10:03 AM

आत्तापर्यंत मुंबईच्या पोलिसांनी उत्तम कामगिरी केल्याच्या अनेक उदाहरण आपण पाहिली आणि ऐकली सुध्दा परंतु आणखी एकाची भर करावी लागेल. काल एका चोरट्याने मानखुर्दमध्ये लोकलमध्ये प्रवेश केला त्याने लोकल वाशीला यायच्या आगोदर अनेक प्रवाशांना दमदाटी करून आणि मारहाण करून लुटले.

आत्तापर्यंत मुंबईच्या पोलिसांनी उत्तम कामगिरी केल्याच्या अनेक उदाहरण आपण पाहिली आणि ऐकली सुध्दा परंतु आणखी एकाची भर करावी लागेल. काल एका चोरट्याने मानखुर्दमध्ये लोकलमध्ये प्रवेश केला त्याने लोकल वाशीला यायच्या आगोदर अनेक प्रवाशांना दमदाटी करून आणि मारहाण करून लुटले. ही माहिती वाशीच्या रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ तिथं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे, ज्यावेळी त्याला पोलिस पकडणार असल्याचा सुगावा लागला त्यावेळी त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी चपळाईने त्याला ताब्यात घेतल्याचे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. त्याने किती जणांना मारहाण केली, त्याचबरोबर किती जणांना लुटले याची पोलिस चौकशी करणार असल्याचे समजते.