मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॅाक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॅाक

| Updated on: Mar 25, 2023 | 9:42 AM

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार असूनही ज्या चाकरमान्यांना कामावर जाव लागतं त्यांना वाहतुकीसाठी दुसरा पर्यांय निवडावा लागणार आहे.

मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार असूनही ज्या चाकरमान्यांना कामावर जाव लागतं त्यांना वाहतुकीसाठी दुसरा पर्यांय निवडावा लागणार आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर हार्बर मार्गावरती कुर्ला-वाशी अप-डाऊन मार्गावर हा ब्लॉक असेल. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरील बोरवली जोगेश्वरी स्थानकादरम्यान पाचव्या मार्गेवरती ही ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे कल्याण मार्गावर सकाळी दहा वाजून 40 मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून 40 मिनिटापर्यंत, बोरवली जोगेश्वरी स्थानकादरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी दहा वाजून 35 मिनिटापर्यंत ते 3:35 या दरम्यान ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावरती कुर्ला-वाशी मार्गावरती सकाळी 11 वाजून दहा मिनिटांपासून दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल.

Published on: Mar 25, 2023 09:42 AM