पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. पुढील दोन तीन दिवसातही हलक्या पावसाची दाट शक्यता असून या हवामानाच पिकांवर अनिष्ठ परिणाम होणार आहे. यवतमाळ, अमरावतीमध्ये परिसरात या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असून त्याआधीच शेतकऱ्यांनी पिकांवर औषध फवारणी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी नंतरही दोन दिवस हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सगळ्यात जास्त फटका गहू, हरभरा आणि संत्रा पिकाला बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Latest Videos