Yavatmal | यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Yavatmal | यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

| Updated on: Sep 03, 2021 | 8:19 PM

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस बरसला.

यवतमाळ :  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस बरसला. पावसाचा जोर अधिक असल्याने कामावर जाणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला दुकानात आडोसा शोधावा लागला. यवतमाळ तहसीलदार यांच्या कक्षातही पाणी शिरल्याने कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांची दाणादाण उडाली. कर्मचाऱ्यांना पाण्यात खुर्ची टाकूनच काम करावे लागले.
Published on: Sep 03, 2021 07:59 PM