Maharashtra Rain Update | राज्यात पुन्हा पावसाची दडी, पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा ब्रेक

Maharashtra Rain Update | राज्यात पुन्हा पावसाची दडी, पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा ब्रेक

| Updated on: Aug 23, 2021 | 8:15 AM

आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. उर्वरित भागात पावसाची उघडीप असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थितीत निर्माण झाली होती.

राज्यात पुन्हा पावसाची दडी, पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा ब्रेक. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र, पावसाने आता पुन्हा दडी मारली आहे. आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. उर्वरित भागात पावसाची उघडीप असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थितीत निर्माण झाली होती.