Rain Update | 28 तारखेपर्यत पाऊस घेणार विश्रांती, कोकण, पालघर, ठाण्यात मात्र पावसाची शक्यता

Rain Update | 28 तारखेपर्यत पाऊस घेणार विश्रांती, कोकण, पालघर, ठाण्यात मात्र पावसाची शक्यता

| Updated on: Jul 25, 2021 | 9:50 AM

गेल्या आठवड्याभरापासून दाणादाण उडवलेल्या पाऊस राज्यातील काही भागात विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. तर मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्याभरापासून दाणादाण उडवलेल्या पाऊस राज्यातील काही भागात विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या 28 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. मात्र कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.