मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचा सल्ला काय?

मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचा सल्ला काय?

| Updated on: Nov 22, 2023 | 5:19 PM

आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं पाहिजे, ही मनसेची भूमिका असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणुका येत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, राज ठाकरे यांनी दिले आदेश

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात एकच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही असे जरांगे पाटील यांच्या तोंडावर सांगितले होते. तर जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल, असेही म्हटले होते. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी डेडलाईन दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे राज्यव्यापी दौरे सुरू आहेत. अशातच आरक्षणाच्या वादात पडू नका, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तर आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं पाहिजे, ही मनसेची भूमिका असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणुका येत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.

Published on: Nov 22, 2023 05:19 PM