Raj Thackeray Aurangabad : संजय राऊतांनी राज ठाकरेंचा ‘नवहिंदू ओवैसी’ उल्लेख केल्यानंतर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

Raj Thackeray Aurangabad : संजय राऊतांनी राज ठाकरेंचा ‘नवहिंदू ओवैसी’ उल्लेख केल्यानंतर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया

| Updated on: Apr 30, 2022 | 9:04 PM

संजय राऊत त्यांच्या नैराश्यातून हे बोलत आहेत. त्यांनी दोन भावांना समोर बसवून हे भांडण सोडवावं, उगाच असे बोलत फिरू नये, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. राज्यात सध्या औरंगाबदच्या राज ठाकरेंच्या सभेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबई : उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) आज औरंगाबादेत दाखल झाले आहेत. सभेने आधीच वातावरण टाईट केले आहे. अशातच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे खासदार इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीला औरंगाबादेत (Aurangabad) पोहोचले. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्या. त्याच्या आधी काही वेळच शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंचा पुन्हा नवहिंदू ओवैसी असा उल्लेख केला होता. यावेळी याबाबत ओवैसी यांना विचारले असता, असदुद्दीन ओवैसी यांनीही जोरदार टोला लगावाल आहे. हे दोन भावांचं भांडण आहे. संजय राऊत त्यांच्या नैराश्यातून हे बोलत आहेत. त्यांनी दोन भावांना समोर बसवून हे भांडण सोडवावं, उगाच असे बोलत फिरू नये, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. राज्यात सध्या औरंगाबदच्या राज ठाकरेंच्या सभेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना नेत्यांनी मात्र ही भाजपची बी आणि सी टीम आहे, असा उल्लेख एमआयएम आणि मनसेचा केला आहे.