'या वयातही आशाताई काय दिसतात ना!', राज ठाकरेंकडून आशा भोसलेंच्या सौंदर्याचं कौतुक

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून आशा भोसलेंच्या सौंदर्याचं कौतुक

| Updated on: Aug 14, 2021 | 2:32 PM

पुणे येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे 100 व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते.

पुणे येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे 100 व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ओळख दिलखुलास आणि रोखठोक व्यक्तिमत्वासाठी आहे. आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंचावर उपस्थित ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या सौंदर्याचं वर्णन राज ठाकरे यांनी केलं. ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना…’ असं राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या विधानानंतर ते स्वत:ही हसले आणि उपस्थितांमध्येही खसखस पिकली.