भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले... ‘कोणी कोणाला भेटलं की...’

भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले… ‘कोणी कोणाला भेटलं की…’

| Updated on: Jul 26, 2023 | 1:04 PM

शिंदे-फडणवीस युतीत अजित पवार यांनी आपल्या गटासह प्रवेश केला. आणि राज्यात शिंदे-फडणवीस आणि पवार अशी युती तयार झाली आहे. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते.

पुणे | 26 जुलै 2023 : राज्याच्या राजकारण सध्या अनेकांना धक्का बसणाऱ्या युत्या होताना दिसत आहे. याचदरम्यान शिंदे-फडणवीस युतीत अजित पवार यांनी आपल्या गटासह प्रवेश केला. आणि राज्यात शिंदे-फडणवीस आणि पवार अशी युती तयार झाली आहे. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. तर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे यांची भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर भाजप-मनसे युती होईल अशी चर्चा रंगली होती. त्यावरून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका वाक्यातच उत्तर देताना, फक्त भेट झाली म्हणजे युती होत नाही असा टोला लगावला आहे. तर हे यांना भेटले म्हणजे लगेच युती होते का असा सवाल देखील त्यांनी पत्रकारांना केला. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाचा किस्सा सांगताना आपली आणि शरद पवार यांची युती झाली का असा देखील सवाल केलाय. तर हा फक्त तुमच्या बुलेटीनचा भाग असतो. ज्याचा आमच्याशी काहीच संबंध नसतो असे म्हणत हा विषयच निकाली काढला.

Published on: Jul 26, 2023 01:04 PM