महानगपालिका निवडणुकीचा निर्णय राज ठाकरे घेतील
येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच 2 फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. त्याामुळ राजकीय वर्तुळात या बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईः महानगरपालिका निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षानी तयारी केली आहे. येत्या 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेचे निवडणूकीसाठी रणनिती काय असणार आणि युतीबाबत काय निर्णय घ्यायये याबाबत या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करायची का नाही हा निर्णय राज ठाकरे घेतील तो निर्णय काय असेल याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात लागली आहे.
Published on: Jan 29, 2022 07:37 PM
Latest Videos