Breaking | मनसेचा उद्याचा भांडूपमधील आणि शनिवारी पुण्यात होणारा मेळावा रद्द

Breaking | मनसेचा उद्याचा भांडूपमधील आणि शनिवारी पुण्यात होणारा मेळावा रद्द

| Updated on: Oct 22, 2021 | 5:56 PM

मनसेचा उद्या होणारा मुंबईतील आणि परवा होणारा पुण्यातील मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

मनसेचा उद्या होणारा मुंबईतील आणि परवा होणारा पुण्यातील मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. मेळावा रद्द करण्यामागचं कारण मनसेकडून देण्यात आलेलं नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मनसेच्या ट्विटर हँडलवरून मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार 23 ऑक्टोरबर रोजी मुंबईत, तर 24 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मेळावा रद्द करण्याचं कारण देण्यात आलेलं नाही. मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

Published on: Oct 22, 2021 05:48 PM