‘लाडके बहीण-भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’, मनसे नेत्याची मागणी काय?

‘लाडके बहीण-भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’, मनसे नेत्याची मागणी काय?

| Updated on: Jul 19, 2024 | 4:40 PM

'वंचित, दुर्बल घटकातील गोरगरिबांच्या मुलांना RTE मधून खाजगी शाळेत मोफत शिक्षणाचा हक्कच राज्य सरकारने काढून घेतला आहे. यामुळे हजारो मुलांना शाळेत अद्यापही प्रवेश मिळू शकला नाही. शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो गोरगरीब मुलांचे प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवावे'

लाडकी बहीण, लाडका भाऊ या राज्य सरकारच्या योजनेवरून मनसे नेते गजानन काळे यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. वंचित, दुर्बल घटकातील गोरगरिबांच्या मुलांना RTE मधून खाजगी शाळेत मोफत शिक्षणाचा हक्कच राज्य सरकारने काढून घेतला आहे. यामुळे हजारो मुलांना शाळेत अद्यापही प्रवेश मिळू शकला नाही. RTE मध्ये राज्यभरात 9331 शाळा असून 1 लाख 15 हजारच्यावर जागा आहेत. सरकार विरोधात जनहित याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यामुळे राज्यसरकारने प्रक्रिया पूर्ण करूनही खाजगी शाळेत मुलांना अद्यापही प्रवेश देण्यात आले नाही, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे. अनेक वर्ष खासगी शाळांना देण्यात येणारे परतीचे असे 1800 करोड रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण, भाऊ झाले असतील तर या लाडक्या नातवांसाठी पण पैसे भरून टाकावे सरकारने आणि शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो गोरगरीब मुलांचे प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवावे, अशी मागणी मनसे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली.

Published on: Jul 19, 2024 04:40 PM