मिटकरींवर 'मनसे'चा पुन्हा हल्लाबोल, घासलेट चोर म्हणत काढली लायकी अन् नवं प्रकरण केलं उघडं

मिटकरींवर ‘मनसे’चा पुन्हा हल्लाबोल, घासलेट चोर म्हणत काढली लायकी अन् नवं प्रकरण केलं उघडं

| Updated on: Aug 07, 2024 | 1:32 PM

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे. याच्यातील शाब्दिक वार काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. असे असताना आज पुन्हा मनसेच्या नेत्यानं अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी हे राज ठाकरे यांना सुपारीबहाद्दर म्हणाले. खरंतर अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत. त्यांचं घासलेटचं रेशनींगचे दुकान होते. त्यांच्यावर कारवाई कारण्यात आली. त्यांच्या विरोधात 23-02-2016 ची तक्रार आहे आणि गुन्हा नोंद झालेला तरी सुद्धा अजित दादांनी त्यांना विधानपरिषद आमदारकी दिली, असे म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला. तर अमोल मिटकरी यांच्याबद्दल अनेक आरोप आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकरण उघडं केलं आहे. अकोल्यामध्ये जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे हे ACB च्या कारवाईत निलंबित होते त्यांना पुन्हा सेवेत घेतलं परत त्यांच्यावर कारवाई झाली. तेव्हा अमोल मिटकरी यांनी दिलीप वळसे पाटील यांना 24/08/2024 रोजी कामावर रुजू करण्यासाठी पत्र दिलेला होतं. तेव्हा ते गृहमंत्री होते. प्रवीण लोखंडे आता परत त्याच्या ठिकाणी आले असताना आता ते पुरावे नष्ट करत आहेत. त्यावेळी कारवाई झाली पण त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याने हे प्रकरण थंड झालं. मात्र देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे त्यांनी याबाबत चौकशी करावी, असे म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Aug 07, 2024 01:32 PM