मनसेची मोठी खेळी… शिंदेंच्या शिवसेनेसमोर 10 जागांचा प्रस्ताव, ‘या’ जागांवर पाठिंब्याची मागणी
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्होंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू असताना मनसेकडून आता शिंदेंच्या शिवसेनेसमोर 10 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माणसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे विधानसभेच्या 10 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसेकडून शिवसेनेच्या शिवसेनेकडे दहा जागांसाठी अधिकृतरित्या प्रस्ताव देण्यात आला आहे. या दहा जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात यावा अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे देण्यात आलेल्या जागांमध्ये मुंबईतील तीन महत्त्वाचे मतदारसंघ आहे. वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी आणि दिंडोशी या जागांसाठी मनसेकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. यासोबतच भांडूप, विक्रोळी, कल्याण या जागांसाठीही प्रस्ताव देण्यात आला आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या या प्रस्तावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.