“बाळासाहेबांनी मला जवळ बोलावलं..”, शिवसेना सोडण्यापूर्वी त्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं? राज ठाकरेंचा खुलासा
"मला आजही ती गोष्ट आठवतेय की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काय राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत तुम्हाला कधी ही गोष्ट बोललो नाही."
“मला आजही ती गोष्ट आठवतेय की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काय राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत तुम्हाला कधी ही गोष्ट बोललो नाही. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते रुमच्या बाहेर गेले. ते बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर नाही गेलो. बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला”, असं राज ठाकरे म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 02:54 PM
Latest Videos